Latest

Tiger 3 : ‘पठान’वर भारी पडणार ‘टायगर ३’?; अवघ्या एक तासात १ कोटीची कमाई

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मीला एकत्रित पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला म्हणजे, दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचा 'टायगर ३' ( Tiger 3 ) हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने भऱघोष अशी कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या एका तासात १ कोटीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. यामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' चे रेकॉर्ड मोडेल की काय? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्याच्या एक्स (x) ट्विटवरून सलमानच्या 'टायगर ३' च्या ॲडव्हान्स बुकिंगच्या तिकिटीचे आकडे समोर आले आहेत. त्यात म्हटलं की, 'टायगर ३' या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. PVRInox मध्ये ७,५०० तिकिटे, दिल्लीत २,८०० तिकिटे आणि हैदराबादमध्ये १.४७० तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय इतरही राज्यात सध्या अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. यामुळे जवळपास 'टायगर ३' नं १ कोटीची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे गेल्या अवघ्या २४ तासांत ३६.६९ हजार तिकिटे बुक करण्यात आली आहेत. यावरून सलमानचा 'टायगर ३' बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' च्या पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडेल अशी आशा आहे.

'टायगर ३' हा चित्रपट याच महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १२ नोव्हेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान, कॅटरिना कैफ आणि अभिनेता इमरान हाश्मी यानी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान या चित्रपटात कॅमिओ करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT