Latest

Tiger 3 Movie : फक्त काही मिनिटांचा अवधी, ‘टायगर का मेसेज’ टीझरसहित येतोय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानचा टायगर ३ (Tiger 3) चित्रपटाचा टीझर आज २७ सप्टेंबर, २०२३ रोजी रिलीज होतोय. सलमान खान, कॅटरीना कैफ आणि इमरान हाशमी स्टारर टायगर ३ यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने रिलीज केला जाईल. रिलीजच्या आधी टायगर ३ चा फर्स्ट टीजर रिलीज केला जाईल. निर्मात्यांनी याला 'टायगर का मेसेज' नाव दिलं आहे. YRF आज सकाळी ११ वाजता टायगर का मेसेज रिलीज करणार आहे! (Tiger 3 Movie)

यशराज फिल्म्स उद्या सकाळी 11 वाजता टायगर चा मेसेज रिलीज करणार आहे, हा व्हिडिओ टायगर 3 च्या ट्रेलरची प्रस्तावना आहे. या व्हिडिओमुळे टायगर ३ च्या प्रचार मोहिमेची सुरुवात होणार आहे.

विशेष म्हणजे, आज YRF चा स्थापना दिवस, दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा मुलगा, आदित्य चोप्राकडे YRF स्पाय युनिव्हर्सची जबाबदारी आहे आणि टायगर ३, सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर या फ्रँचायझीचा पुढचा मोठा चित्रपट आहे.

टायगर चा मेसेज व्हिडिओमध्ये सलमान खान एजंट टायगरच्या भूमिकेत एक महत्त्वाचा संदेश देणार आहे. सलमानने YRF स्पाई युनिव्हर्स ची सुरुवात एक था टायगर सोबत केली होती. टायगर 3 चे दिग्दर्शन YRF चे स्वदेशी चित्रपट निर्माता मनीश शर्मा यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT