Latest

आता गुरुजींचा पगार एक तारखेलाच !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्त्तसेवा :  कर्मचार्‍यांना नेहमीच आपला पगार वेळेवर व एक तारखेलाच व्हावा, अशी एकच अपेक्षा असते. नगर जिल्हा परिषदेअंतर्गतील शिक्षकांचीही हीच मागणी होती. या पार्श्वभुमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी जिल्हा परिषद मॉनिटरिंग सिस्टमबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. परिणामी, 11160 शिक्षकांचा सप्टेंबर महिन्याचा 98 कोटींचा पगार ऑक्टोबरच्या 1 तारखेलाच सकाळी जमा झाला आहे. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे शिक्षक संवर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.

शिक्षकांचे पगार हे एक तारखेलाच जमा व्हावेत, याबाबत प्रशासनाला शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी निवेदन देण्यात येते. शिक्षणाधिकारी पाटील यांनी याबाबत दखल घेवून तत्काळ तशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम यांनी याबाबत अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार सप्टेंबरचे वेतन रविवार 1 ऑक्टोबर रोजी सर्व शिक्षक व केंद्र प्रमुख कर्मचार्‍यांच्या बँक खातात सकाळी 9 वाजताच वर्ग झाले आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच राजन डोंगरे, शेख, जिल्हा शालार्थ प्रमुख योगेश पंधारे यांच्या एक तारखेेलाच वेतन करण्याच्या या निर्णयाचे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, डॉ. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, प्रविण ठुबे, एकनाथ व्यवहारे, शरद वांढेकर, रवींद्र अरगडे आदींनी स्वागत केले

आज एक तारखेलाच पगार झाले. त्यामुळे झेडपीचे सीईओ आणि शिक्षणाधिकार्‍यांंचे मनापासून आभार मानतो. यापुढेही प्रशासनाकडून यात असेच सातत्य असावे, अशीच अपेक्षा आहे.
                                                 -एकनाथ व्यवहारे, इब्टा संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT