Latest

Salaar Movie : सालार चित्रपटाला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : होम्बले फिल्म्स सालार : पार्ट 1 सीझफायर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या –

आता हा चित्रपट भव्य थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास अवघे दहा दिवस उरले आहेत. एका अपडेटनुसार, असे समोर आले आहे की, हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) सादर करण्यात आला आहे आणि सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २ तास 55 मिनिटांच्या रनटाईमसह 'ए' प्रमाणपत्र मिळाले.

होम्बल फिल्म्स निर्मित, सालार: पार्ट १ सीझफायर चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

SCROLL FOR NEXT