Latest

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिक, बजरंग पुनियाची माघार?

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. दोघेही रेल्वेत नोकरीवर परतले असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे.

साक्षी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दरम्यान, पैलवानांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे काहींचे म्हणणे आहे.

कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. बजरंग, साक्षी आणि विनेश यांनी पहिल्यांदा १८ जानेवारीला दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी क्रीडा मंत्रालयाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. पण कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत कुस्तीपटूंनी पुन्हा २३ एप्रिल रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले.

साक्षी आणि बजरंगने ब्रिजभूषण यांच्या विरोधातील आंदोलनातून माघार घेणे हे या आंदोलनाचे मोठे नुकसान मानले जात आहे. विनेश फोगट देखील या आंदोलनातून माघार घेऊन कामावर परतू शकते.

दरम्यान नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी या आंदोलकांनी संसदर भवनावर मोर्चा काढला होता. तो मोर्चा सरकारने दडपून टाकत. जंतरमंतरवरचे त्यांचे आंदोलनही मोडून काढले होते. त्यानंतर या कुस्तीपटूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी साक्षी मलिक तिच्या पदकांसह हरिद्वारच्या गंगा किनाऱ्यावरही पोहोचली होती.

SCROLL FOR NEXT