Latest

Saba Azad : चांगला डान्स, पण पुन्हा करू नकोस! सबाची उडवली खिल्ली,

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादने दिल्ली फॅशन वीकमध्ये रँपवर उतरल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. (Saba Azad) तिचा लुक आणि डान्स पाहून सर्व जण अचंबित झाले. सबाला रँपवर याप्रकारे डान्स करताना काही लोकांनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले तर काही प्रेक्षक तोंड आ वासून राहिले. तिचा हा प्रकार पाहून काहींनी तिला ट्रोल करणं सुरु केले. तिचा रॅम्प वॉक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. (Saba Azad)

संबंधित बातम्या –

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

दिल्लीमध्ये आयोजित या फॅशन शोमध्ये सबा आजाद (Saba Azad) शिवाय अनेक सेलेब्स पोहोचले होते. यामध्ये करिश्मा कपूर, कल्कि केकला शिवाय अनेक आणि स्टार्स दिसले होते. परंतु, सबा आजाद जेव्हा रॅम्पवर आली तेव्हा तिचा व्हिडिओ मिनिटांमध्ये व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सबाने जशी रॅम्पवर एंट्री घेतली, तेव्हा तिने वॉक करताना डान्स करणे सुरू केलं. सबाच्या चेहऱ्यावरी एक्सप्रेशन आणि ज्याप्रकारे ती रॅम्पवर डान्स करत होती, त्यामुळे तिचा आत्मविश्वास पाहून कौतुक करण्यात आले. पण, काहींनी तिला ट्रोल केलं.

video-viralbhayani , mamaraazzi insta वरून साभार

एका ट्रोलरने लिहिलं-' असे वाटत आहे की, रानू मंडलला तयार करण्यात आलं आहे.' दुसऱ्या ट्रोलरने लिहिलं- चांगला डान्स, पण पुन्हा ट्राय करू नकोस,'? तिसऱ्या ट्रोलरने लिहिलं की- हा कोणता नशा आहे?'

कोण आहे सबा?

सबा आजादने बॉलीवूडमध्ये चित्रपट 'दिल कबड्डी'तून डेब्यू केलं होतं. अभिनेत्रीसोबतच सबा म्युझिशियन आणि सिंगरदेखील आहे. सबा आजाद प्रोफेशनल डान्सरदेखील आहे.

SCROLL FOR NEXT