Latest

गाणे असे की एकत्र येतील सारे! सा रे ग म प लिटिल चॅम्प लवकरच भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीचा 'सा रे ग म प' या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला आणि चित्रपट सृष्टीला दिल्या. मराठी संगीत क्षेत्रात 'सा रे ग म प' चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे. 'सा रे ग म प' च्या प्रवासात अनेक पर्व झाली त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो "सा रे ग म प लिटिल चॅम्प्स"चा हे पर्व तुफान गाजलं ते म्हणजे 'पल्लवी जोशी' च्या खुमासदार सूत्रसंचालनाने आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर ह्या पंचरत्नांमुळे. यंदाचं हे पर्व जरा वेगळे असणार आहे.

आजपर्यंत स्पर्धक ऑडिशनला येतात पण ह्यावेळी सारेगमपचे परीक्षक अखंड महाराष्ट्रातून प्रेक्षकांना भावणारे सूर शोधून आणणार आहेत आणि ही जबाबदारी 'सलील कुलकर्णी' आणि 'वैशाली भैसने' यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. सलील कुलकर्णी यांनी याआधी सारेगमपचे परीक्षक म्हणून काम केले आहे. पण सारेगमपची विजेती महागायिका वैशाली पहिल्यांदाच परीक्षण करणार आहे. या पर्वाची आणखी एक खासियत म्हणजे यावर्षी सुरेश वाडकर हे एका खास भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT