Latest

Nuclear Power Plant : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

backup backup

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : रशियाची युक्रेनवर मागच्या ९ दिवसांपासून लष्करी कारवाई सुरूच आहे. युक्रेनच्या कित्येक शहरांवर रशियांच्या सैन्याने ताबा घेतला आहे. दरम्यान युक्रेनमधील झापोरिझ्झ्या न्युक्लियर पावर प्लांटमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. (Zaporizhzhia Nuclear Power Plant)

रशियाचे सैन्य युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करत आहे. रशियाने ही कारवाई लवकरात लवकर थांबवावी असे आवाहन एनेरहोदर शहराचे येथील प्लांटचे प्रवक्ते अँड्री तुझ यांनी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून केले आहे.

दरम्यान, युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रामध्ये आण्विक धोका होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनच्या वीजनिर्मितीपैकी सुमारे एक चतुर्थांश ऊर्जा निर्मितीया प्लांटमध्ये होते. तुझ पुढे म्हणाले की, झापोरिझ्झिया प्लांटवर थेट गोळीबार होत असल्याने काही भाग कोसळत आहे. दरम्यान ६ अणुभट्ट्यांपैकी एकाला आग लागली आहे. ज्या अणुभट्टीला आग लागलीय त्याचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ती सद्यस्थितीत बंद आहे.

परंतु गोळीबार सुरू असलेल्या त्या ठिकाणी रेडिएशन लीक होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. असे तुझ यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे जवान आगीजवळ जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचेही तुझ यांनी सांगितले.

nuclear power plant : मोठा धोका होण्याची भिती

अणुऊर्जा प्रकल्पाच्या होमपेजवरून लिंक केलेल्या लाइव्ह-स्ट्रिमिंग सुरक्षा कॅमेर्‍यात पार्किंगमध्ये वाहने फिरताना दिसत आहेत. तसेच इमारतींवर कॅमेरे बसवले आहेत त्या ठिकाणी काहीतरी वाहनांमधून काहीतरी चमकत असल्याचे दिसत आहे. जवळपास एकाचवेळी बिल्डींगमधून स्फोट होताना दिसत आहेत. धुराचे लोट आल्याने कॅमेऱ्यामध्ये अस्पष्ट दिसत असल्याचे तुझ यांनी सांगितले.

युक्रेनच्या वीजनिर्मितीपैकी एक चतुर्थांश वाटा असलेल्या नीपर नदीवरील शहर एनरहोदर येथे मोठ्या प्रमाणात रशिया आणि युक्रेनियन सैन्य आमने सामने आले. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेच्या दुसर्‍या फेरीत युक्रेनमध्ये नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुविधा पुरवण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उभारण्याचा तात्पुरता करार झाला आहे.

एनरहोदरच्या महापौरांनी सांगितले की युक्रेनियन सैन्याने शहराच्या बाहेरील भागात रशियन सैन्याशी लढा दिला. युक्रेनच्या १५ आण्विक अणुभट्ट्यांना नुकसान होऊ शकते अशी भिती U.N. atomic watchdog एजन्सीने व्यक्त केल्याच्या एका दिवसानंतर असा प्रकारसमोर आला आहे. शहरावर काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT