Latest

Russia Ukraine War : युक्रेन कदापि शरणागती पत्करणार नाही : व्लादिमीर झेलेन्स्की

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : Russia Ukraine War : आम्ही ठाम आहोत, पाय रोवून उभे आहोत, आम्ही कदापि शरणागती पत्करणार नाही,असे सांगत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेने केलेली मदत ही देणगी नसून ती लोकशाहीमध्ये केलेली गुंतवणूक आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे आभार मानले.

Russia Ukraine War : रशियासोबत युद्ध सुरु झाल्यानंतर प्रथमच झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा दौरा केला. प्रारंभी व्हाईट हाउसमध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट त्यांनी घेतली. यावेळी बायडेन यांनी अमेरिका युक्रेनच्या पाठीशी मजबुतीने उभी असल्याचे सांगितले. त्यानंतर गुरुवारी झेलेन्स्की यांनी अमेरिकी काँग्रेसपुढे भाषण केले. सभागृहात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Russia Ukraine War : आपल्या भाषणात त्यांनी अमेरिकेचे आभार मानताना त्यांनी लोकशाही मूल्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, अमेरिकेने केलेली मदत ही देणगी नसून ती लोकशाहीमध्ये केलेली गुंतवणूक आहे. मागील 300 दिवसांपासून आम्ही रशियाच्या आक्रमणाला पुरून उरलो आहोत. आम्ही ठाम आहोत, पाय रोवून उभे आहोत, आम्ही कदापि शरणागती पत्करणार नाही असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT