Latest

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्याचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी भारताला मोठा धक्का

रणजित गायकवाड

खार्किव (युक्रेन) : पुढारी ऑनलाईन

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मृत विद्यार्थी पंजाबच्या बर्नाला येथील रहिवासी असल्याचे समजते. कालच खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का बसला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. ( Russia Ukraine War Live ) युक्रेनची राजधानी कीव्‍हवर कब्‍जा मिळविण्‍यासाठी रशियन कमांडो पथक उतरले आहे. शहराबाहेर ६४ किलोमीटर अंतर रशियन लष्‍कराने कब्‍जा केला आहे. अशातच युक्रेनच्‍या दक्षिण-पूर्व भागातही रशियन सैन्‍याने आगेकूच सुरु असल्‍याचे वृत्त आहे. आज सकाळी खार्किवमध्‍ये रशियन सैन्‍याने हवाई मार्गाने घुसखोरी केली. यानंतर एका हॉस्‍पिटलमध्‍ये हल्‍ला केल्‍याचे युक्रेनच्‍या लष्‍कराने म्‍हटलं आहे.

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीत पंजाबमधील बर्नाला येथील चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. 2 फेब्रुवारीच्या रात्री ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराच्या झटक्याने चंदन कोमात गेला आणि त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत चंदनच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह भारतात आणण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे.

बर्नालाच्या सरकारी रुग्णालयातील फार्मासिस्ट शिशन जिंदाल यांचा मुलगा चंदन 2018 मध्ये एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेला होता. चंदन व्हेनेशिया शहरातील नॅशनल पायरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. त्याला 2 फेब्रुवारीच्या रात्री ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. 4 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली, मात्र तो कोमात गेला. बुधवारी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

मुलाची काळजी घेण्यासाठी वडील आणि काका युक्रेनमध्ये..

काही दिवसांपूर्वी मुलगा चंदनची काळजी घेण्यासाठी त्याचे वडील शिशन कुमार आणि काका कृष्ण कुमार युक्रेनला पोहोचले. त्यानंतर दोन दिवसांनी युद्ध सुरू झाले. यातच काका कृष्ण कुमार दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी बर्नाला येथे परतले. पण चंदनचे वडील उक्रेनमध्येच अडकले. मुलाच्या मृत्यूनंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या वडिलांची अडचणीत सापडले आहेत. मुलाच्या मृत्यूची बातमी आणि पती युक्रेनमध्ये अडकल्याचे समजताच आई किरण आणि इतर कुटुंबीयांचीही अवस्था बिकट झाली आहे.

खार्किव्‍हमध्‍ये रशियन सैन्‍यांची हवाई मार्गाने घुसखोरी

मंगळवारी रात्री खार्किव येथील युक्रेनच्‍या शस्‍त्रासाठा डेपो रशियाने क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍याने उद्‍ध्‍वस्‍त केला. युद्धाच्‍या सातव्‍या दिवशी युक्रेनमधील महत्‍वाच्‍या शहरांवरील हल्‍ले आणखी तीव्र करण्‍यात आले आहेत. खार्किवमध्‍ये रयिशन सैनिकांनी हवाई मार्गाने प्रवेश केला. येथील एका हॉस्‍पिटलवरही त्‍यांन हल्‍ला केल्‍याचे युक्रेनच्‍या लष्‍कराने म्‍हटलं आहे. दरम्‍यान, युक्रेनच्‍या आपत्तकालीन सेवेने नागरिकांसाठी व्‍हॉटस ॲपच्‍या माध्‍यमातून हेल्‍पलाईन सुरु केली आहे. यामुळे हल्‍ला झालेल्‍या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यासाठी मदत होणार आहे.

१०० देशांच्‍या राजदुतांचा रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांचा बहिष्‍कार

संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार परिषदेमध्‍ये १०० देशांच्‍या राजदुतांचा रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांचा बहिष्‍कार टाकला. रशियाचे परराष्‍ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे मानवाधिकार परिषदेमध्‍ये बोलण्‍यासाठी उभारल्‍यानंतर १०० राजदुतांनी सभात्‍याग केला.

आज पोलंडमध्‍ये रशिया-युक्रेनमध्‍ये दुसर्‍या टप्‍प्‍यातील चर्चा

पोलंडमध्‍ये आज रशिया-युक्रेनमध्‍ये दुसर्‍या टप्‍प्‍यातील चर्चा होणार आहे. ही चर्चा आज किती वाजता होईल, हे अद्‍याप स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले नाही. चर्चेचा दुसरा टप्‍पा सुरु होण्‍यापूर्वी रशियाने युक्रेनमधील कीव्‍ह, खार्किव आणि चेर्निहायव शहरांतील नागरी वस्‍त्‍यांवर बॉम्‍बहल्‍ले आणखी तीव्र केले आहेत.

जागतिक बॅकेकडून युक्रेनला ३ अब्‍ज डॉलरची मदत

रशियाने केलेल्‍या हल्‍ल्‍यांमध्‍ये युक्रेनमधील शहरांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता जागतिक बँक युक्रेनच्‍या मदतीसाठी सरसावली आहे. जागतिक बॅकेकडून युक्रेनला ३ अब्‍ज डॉलरची मदत दिली जाणार आहे. यातील ३५ कोटी डॉलर पुढील आठवड्यात दिले जाणार असल्‍याची माहिती जागतिक बँकेच्‍या सूत्रांनी दिली. संयुक्‍त राष्‍ट्राने जाहीर केलेल्‍या माहितीनुसार, आतापर्यंत युक्रेनमधील ६ लाख ६० हजार नागरिकांनी देश सोडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT