Latest

Russia Ukraine war : पाकिस्तान, तुर्कीने घेतला भारतीय तिरंग्याचा आधार

backup backup

कीव्ह ; वृत्तसंस्था : युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला आता सात दिवस उलटले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून सुखरूप परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे. (Russia Ukraine war)

मोदी सरकारने युक्रेनमधील भारतीयांना बंकर किंवा हॉस्टेलमधून बाहेर पडताना त्यांच्या बसवर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रशियन फौजा त्यांना दुखापत करणार नाहीत.

तिरंग्याच्या याच ताकदीचा वापर आता युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही करायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तान तसेच तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही रशियन हल्ल्यांपासून बचावासाठी घरांच्या पडद्यांना तिरंगा ध्वजाप्रमाणे रंगवून गाड्यांवर लावले आहेत. युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ही युक्ती पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनी केली आहे. पण यातून एकप्रकारे भारताच्या परराष्ट्र संबंधांची बळकटीच दिसून येत आहे.

भारतीय दूतावासाने दिशानिर्देश जारी करताना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यास सांगितले होते.

दरम्यान, युक्रेनमधून भारतात परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनीही तिरंग्यामुळेच जीव वाचल्याचे म्हटले आहे. तसेच इतर देशाचे नागरिक आणि विद्यार्थीही तिरंगा ध्वजाचेच 'कवच' करून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, युक्रेनमधील सैन्यासोबत बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्ही भारतीय असाल तर अजिबात घाबरू नका. कारण भारत आणि रशियाचे संबंध चांगेल आहेत. त्यामुळे कुणालाही काहीही नुकसान पोहोचणार नाही.

Russia Ukraine war : पाक, तुर्कीचे विद्यार्थी म्हणाले, प्लॅन यशस्वी झाला

रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून परतलेल्या तुर्की आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनीही याची कबुली दिली. भारतीय तिरंगा ध्वजाच्या कवचामुळेच युक्रेनबाहेर सुखरूप पडू शकतो, याची जाणीव झाली.

त्यानंतर पडद्यांवर स्प्रेच्या सहाय्याने तिरंगा ध्वज साकारला. भारताचे राष्ट्रगीतही गायले आणि दोन्ही बससमोर दोन तिरंगा ध्वज लावले. हा प्लॅन यशस्वी झाला. रशियन सैन्याला वाटले की आम्ही सर्व भारतीय विद्यार्थी आहोत, त्यामुळे आम्हाला जाऊ दिले.

SCROLL FOR NEXT