Latest

Vaibhavi Upadhyay Death : ‘आयुष्याचा भरोसा नाही, विश्वास बसेना’; कलाकारांनी व्यक्त केलं दु:ख

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू (Kullu) जिल्ह्यात अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिच्या फॉर्च्यूनर कारचा अपघात झाला. रिपोर्टनुसार, वैभवी उपाध्याय सोमवारी हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थन व्हॅली येथे जात होती. (Vaibhavi Upadhyay Death) दरम्यान, तीर्थनपासून काही किलोमीटर अलिकडे बंजारयेथील शोजा-सिधवा येथे गाडीवरील नियंत्रण सुटून कार ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरलीय. कलाकारांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे. (Vaibhavi Upadhyay Death)

अपघातावेळी गाडी कोसळतानाचा आवाज पाहून स्थानिय लोक घटनास्थळी पोहोचले.

बीड बिलिंगला भेट दिली होती वैभवीने

जवळपास एक आठवडा आधी वैभवी हिमाचल प्रदेशमदील बीड बिलिंग मध्येही गेली होती. येथे काही दिवस राहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर व्हिडिओदेखील शेअर केला होता. बीड बिलिंग पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

दरम्यान, जेडी मजीठियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे-विश्वास होत नाही. आयुष्याचा काही भरोसा नाही. इंडस्ट्रीची टॅलेंटेड अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले. वैभवीला साराभाई वर्सेस साराबाईच्या जस्मिन नावाने ओळखले जायचे. अपघातात तिचा मृत्यू झाला. तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये पार्थिव घेऊन येणार आहे. रस्ट इन पीस वैभवी.

अभिनेत्री रुपा गांगुलीने म्हटलं आहे-अनुपमा फेम अभिनेत्री रुपा गांगुलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर वैभवीचा एक फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तिने हिंदी चित्रपट, हिंदी मालिका आणि गुजराती नाटकांमध्येही काम केले होते.

SCROLL FOR NEXT