Latest

Rubina Dilaik : रुबिनाचे लवकरच ‘पंजाबी’त पदार्पण

मोहन कारंडे

रुबिना दिलैक ही छोट्या पडद्यावरील सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. रुबिनाने आपला दमदार अभिनय आणि गुणवत्तेच्या बळावर चाहत्यांच्या मनात स्वत:चे खास स्थान मिळवले आहे. 'अर्ध' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलीवूडमध्ये आपल्या आगमनाची वर्दी दिली. टीव्ही व बॉलीवूडमध्ये नशीब आजमावल्यानंतर ही गुणी अभिनेत्री आता गायक-अभिनेता इंदर चहलच्या साथीने 'पंजाबी' चित्रपटात पदार्पण करत आहे. अगदी 'पंजाबी' चित्रपट सृष्टीला देखील रुबिनाच्या पदार्पणाचे वेध लागले आहेत.

मूळ हिमाचलची रुबिना या नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना म्हणते, महिमाचल व पंजाब सिस्टर स्टेट्स आहेत. आमच्या घरी पंजाबी कुटुंबीयांचे नेहमी येणे-जाणे असायचे. त्यामुळे, या चित्रपटाची स्क्रीप्ट समजून घेणे माझ्यासाठी बरेच सोपे होते. माझा आयुष्याचा जोडीदारही पंजाबी आहे. त्यामुळे, मागील अनेक वर्षांपासून माझ्या जीवनावर पंजाबचा बराच प्रभाव राहिला आहे.

आता रुबिनाने 'पंजाबी' चित्रपटात पदार्पण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. पण, तिला उत्तम कथानकाची प्रतीक्षा होती. अभिनव शुक्ला व रुबिना दिलैक हे पंजाबी चित्रपटाचे शौकीन राहिले आहेत, हे देखील येथे लक्षवेधी आहे. रुबिनाने झी टीव्हीच्या एका शोमध्ये राधिका शास्त्रीची व्यक्तिरेखा साकारली होती. तिने 'बिग बॉस 14' चा किताब देखील जिंकला आहे.

SCROLL FOR NEXT