Latest

RSA vs IND 1st T20 : मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसानेच मारली बाजी, नाणेफेकही नाहीच

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सुरुवातीला भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये टी २० मालिका खेळवली जाणार आहे. आज (दि.१०) टी २० मालिकेतील पहिला सामना द. आफ्रिकेतील डर्बनच्या मैदानावर खेळवण्यात येणार होता. मात्र, या सामन्यात पावसानेच बाजी मारली आहे. जोरदार पावसामुळे मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला आहे. (RSA vs IND 1st T20)

काय होता हवामानाचा अंदाज (RSA vs IND 1st T20)

भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यावर पावसाचे संकट आहे. रविवारी डर्बनमध्ये दिवसभरात पाऊस पडण्याची ६० ते ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सामना बाधित होऊ शकतो. डर्बनच्या किंग्समेडची खेळपट्टी जगातील सर्वात वेगवान समजली जाते. येथे वेगवान गोलंदाजाची हवा असते. (RSA vs IND 1st T20) परंतु, धावाही मोठ्या प्रमाणात होतात. तीन महिन्यांपूर्वी येथे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामने झाले. यात तीनवेळा १९० च्या पुढे धावा झाल्या होत्या. येथे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ १८० च्या पुढे धावा करू शकला, तर त्यांना विजयाची जास्त संधी असते. येथे पहिल्यांदा खेळणाऱ्या संघाची १५३ सरासरी आहे. (RSA vs IND 1st T20)

आफ्रिका दौऱ्यासाठी कसा आहे भारतीय संघ? (RSA vs IND 1st T20)

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली नाहीत, तरीही भारताला सेट प्लेईंग इलेव्हन निवडताना डोके खाजवावे लागणार आहे. आफ्रिका दौऱ्यावरील टी-२० मालिकेतील संघात ३ सलामीवीर, मधल्या फळीतील ६ फलंदाज, ४ फिरकीपटू व ४ जलदगती गोलंदाज आहेत. यातून कोणाला अंतिम ११ मध्ये खेळवायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. (RSA vs IND 1st T20)

हेही वाचलंत का?
SCROLL FOR NEXT