Latest

नव्या युगातील कलाकारांसाठी रोमन डायलॉग लिहावे लागतात! : जावेद अख्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क  'आजच्या युगातील कलाकारांना साथ हिंदीही वाचता येत नाही, त्यामुळे मला नाइलाजाने रोमन लिपीत हिंदी डायलॉग लिहावे लागतात आणि त्यानंतरच है कलाकार ते वाचू शकतात, असा अजब गौप्यस्फोट ७९ वर्षीय दिग्गज जावेद अख्तर यांनी केला आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक विदारक सत्य समोर आले.

संबंधित बातम्या 

हिंदी व उर्दू यांच्यातील फरक २०० वर्षांपूर्वीच स्वीकारला गेला आहे. पण, आजचे चित्र अतिशय विदारक आहे, अशी जावेद अख्तर यांची खंत आहे. हिंदी शब्द केव्हा वापरायचा आणि उर्दू शब्द केव्हा वापरायचा, याची काही पथ्ये पाळावी लागतात, इथवर ठीक आहे. पण, जिथे स्क्रीप्टच रोमन लिहावी लागत असेल तर आजच्या नवकलाकारांबाबत आणखी काही न बोललेलेच बरे, असे जावेद अख्तर यावेळी पोटतिडकीने म्हणतात,

SCROLL FOR NEXT