Latest

Rohit Sharma : ‘हिटमॅन’ रोहितने ODI मधील डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडला!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा डिव्हिलियर्सच्या पुढे गेला आहे. हिटमॅन रोहितने श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने (Rohit Sharma) 49 चेंडूत 42 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्याच्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. राईट हँड बॅट्समन असणा-या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 24वी धावा घेताच त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा-या डिव्हिलियर्सला मागे टाकले.

डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9577 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने (Rohit Sharma) लंकेविरुद्धच्या तिस-या सामन्यापूर्वी 9554 धावा केल्या होत्या. रविवारी झालेल्या सामन्यात रोहितने 42 धावा फटकावल्या असून तो त्याच्या नावावर आता वनडेत 9596 धावांची नोंद झाली आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 17 व्या क्रमांकावर पोहचल आहे.

विराट कोहली पहिल्या पाचमध्ये…

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार कोहलीने अप्रतिम खेळ दाखवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्याने नाबाद 166 धावांची खेळी केली. कोहलीने या झंझावाती खेळीत 110 चेंडूंचा सामना केला आणि 13 चौकार आणि 8 षटकार मारले. या खेळीदरम्यान 63 धावा करताच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये पोहोचला. याचबरोबर त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकले. जयवर्धनेने वन-डेच्या 448 सामन्यांत एकूण 12650 धावा केल्या आहेत. तर कोहलीच्या नावावर आता वनडेत 12754 धावा जमा झाल्या आहेत. त्याने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात 46, कसोटीत 27 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.

SCROLL FOR NEXT