Latest

Rohit Pawar on ED : ईडीला यापूर्वी जसं सहकार्य केलं तसेच आताही करणार- रोहित पवारांचे वक्तव्य

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राणार आहेत. दरम्यान, त्यांनी यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही ईडी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी X पोस्ट केली आहे. (Rohit Pawar on ED)

न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय

पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे. पण याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली. तर कुणीही घाबरून जाऊ नये, उलट आदरणीय पवार साहेब आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Rohit Pawar on ED)

सह्याद्री कणखरपणे पाठीशी असेल तर आणखी काय हवंय

माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. (Rohit Pawar on ED)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT