Latest

रोहीणी खडसे : खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो हा आचारसंहितेचा भंग

अंजली राऊत

जळगाव : ऑनलाइन डेस्क न्यूज
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचे छायाचित्र अथवा मतदारांवर प्रभाव पडेल, असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून ते झाकूनच संबंधित वस्तूची विक्री करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे. असे असूनही केंद्र सरकारच्या खत विभागाने देशात 'भारत' या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडून 'भारत' नावाखाली खत पुरवठा होत आहे. मात्र या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र  असल्याने खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो  अद्यापही वापरात असल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचे रोहीणी खडसे यांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT