Latest

Rohini Khadse On Sheetal Mhatre | “तुमची लायकी नाही…”; रोहिणी खडसेंनी म्हात्रेंना सुनावले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना त्यांना महिला दिसत नाही. परंतु स्वत:वर आले की, त्यांना मानसिक सबलीकरण आठवते. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही, अशा शब्दांत शरद पवार गटाच्या रोहिणी एकनाथ खडसे यांनी शितल म्हात्रे यांना सुनावले आहे. शितल म्हात्रे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील महिला कार्यकर्त्या आहेत. (Rohini Khadse On Sheetal Mhatre)

स्वकर्तुत्वाने आमदार तरी होऊन दाखवा- खडसेंचे म्हात्रेंना आव्हान

रोहिणी खडसे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शितल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामामुळे त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार मिळाले. तसे तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार तरी होऊन दाखवा, असे आव्हान देखील त्यांनी म्हात्रे यांना दिले आहे. (Rohini Khadse On Sheetal Mhatre)

सुळे कर्तृत्वान महिलांच्या यादीत, हिंमत असेल तर कोर्टात जा- खडसे

दरम्यान, 'इंडिया टुडे'ने नुकतीच देशभरातील कर्तृत्वान महिलांची यादी जाहीर केली. यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंचा देखील समावेश आहे. यावरून शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना, "वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे" अशी टीका केली होती. यावरून देखील रोहिणी खडसे यांनी शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी सुनावले आहे. त्या म्हणाल्या, " राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा". (Rohini Khadse On Sheetal Mhatre)

सुप्रिया सुळेंवर टीका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर….

ईडीची चौकशी लागेल म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाईने सुप्रिया सुळे यांच्यावर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखे आहे. त्यामुळे शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेवावे. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे देखील रोहिणी खडसे यांनी शीतल म्हात्रे कडक यांना शब्दांत सुनावले आहे. (Rohini Khadse On Sheetal Mhatre)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT