Latest

चारा घोटाळ्यातील पाचव्या केसमध्ये लालू प्रसाद यादव दोषी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील बहुचर्चित 950 कोटींच्या चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. रांचीच्या सीबीआय कोर्टाने त्याला डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरवले आहे.

या प्रकरणात एकूण १७० आरोपी होते, परंतु खटल्यादरम्यान ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. तपास संस्थेने २००१ मध्ये लालू यादव यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते आणि २००५ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते.

SCROLL FOR NEXT