पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील सुप्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांने आपले बाबा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा जन्मदिवस झाला. रितेशने त्यावेळी त्यांचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांने लिहिले होते की, "पप्पा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… मी तुम्हाला खूप मिस करतोय. मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याने पुढे असेही लिहलं आहे की, मला तुम्हाला पुन्हा एकदा हसताना बघायचंय. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तुझ्याबरोबर मी असेन, असं तुमचं शब्द मला ऐकायचे आहेत. तुमचा हात हातात धरुन मला चालायचं आहे. नातवंडांना खेळवताना, त्यांना गोष्टी सांगताना तुम्हाला पाहायचंय. तुम्ही मला माझ्यासोबत हवे आहात पप्पा. मला खूप आठवण येतीय तुमची", अशी भावूक पोस्ट त्यांने लिहिली होती.
तर आज त्यांने विलासरावांची लग्नपत्रिका शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. विलासराव देशमुख कालच्याच दिवशी म्हणजे २९ मे १९७५ रोजी विवाहबद्ध झाले होते. या आठवणीत रितेशने त्यांच्या लग्नाची पत्रिका ट्विट करत शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
हेही वाचलंत का?