Latest

ऋषभ पंत, अक्षर पटेल यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : : ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी आज (दि.३) तिरुपती येथील बालाजीचे दर्शन घेतले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऋषभ पूर्णपणे खेळण्यासाठी पूर्णपणे फिट होण्यापासून काही पावले दूर आहे. कार अपघातानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरला आहे. एका वृत्तानुसार, जानेवारी २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

अक्षर पटेलने त्याच्या इंस्टाग्रामवर ऋषभ पंत ट्रेडमिलवर धावतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तो 'तू भागा मिल्खा' म्हणत होता. जणू तो ऋषभ पंतला प्रोत्साहन देत आहे. ऋषभ पंतला धावताना पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच खूप आनंद होईल. येत्या काही महिन्यांतच ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात परतताना दिसणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT