Latest

पावसाने हजेरी लावल्याने मावळात भात लागवडीला वेग

अमृता चौगुले

टाकवे बुद्रुक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मावळ तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने ठिकठिकाणी भात लागवडीची कामे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा पाऊस न झाल्याने संपूर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील भुईमूग, सोयाबीन, तूर, वाल, तीळ आदि कडधान्य पिकांची पेरण्या खोळंबल्या होत्या. काही शेतकर्‍यांनी धूळ वाफेवर पेरण्या केलेल्या शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण होते नदी काठी असलेल्या गावांनी शेतीच्या पाण्याची सोय आहे त्या शेतकर्‍यांनी विदूत पंपाच्या सहाय्याने पाणी घेऊन भात रोपे तयार केली. जुलै च्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाचे आगमन झाल्याने आदर मावळ, पवन मावळ, नाने मावळ परिसरात ठिक ठिकाणी पारंपरिक रूढ असलेली साथ ,कुलदैवत ला नेवेद्य, श्री फळ वाहिल्या शिवाय भात लागवड केली जात नाही.

सतत धार पावसामुळे बळीराजाची भात लावणीची परिसरात लगबग दिसून येत आहे.सद्या समाधान कारक पाऊस पडत असल्याने बळीराजा पारंपरिक पद्धतीने भात लागवडी सह आधुनिक पद्धतीचा ही वापर करत आहे. परिसरात जुन्या भात वाना पेक्षा इंद्रायणी, सोनम, बासमती, समृद्धी, या सारख्या वानांना प्राधान्य दिल आहे. पूर्वी भात लावणी साठी बेल जोडी मोठ्या प्रमाणात चिखल करताना दिसून येत असे आता आधुनिक पद्धतीने कमी कष्ट पडत असल्यामुळे शेतकरी ट्रेकटर चा वापर शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT