Latest

Review petition : रिव्ह्यू पिटिशन ही आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी

सोनाली जाधव

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा मराठा: आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिव्ह्यू पिटिशनवर आज (११ एप्रिल) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची एक मोठी संधी असून, राज्य सरकारने कायदेशीर ठोस पावले उचलत जोरदारपणे बाजू मांडावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षण प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले. (Review petition)

यासंदर्भात पाटील म्हणाले की, राज्य सरकारकडे तज्ज्ञ वकिलांची टीम असून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते याचा राज्य सरकारचा अभ्यास आहे. त्यामुळे रिव्ह्यू पिटिशनची संधी दवडू नये. ही संधी गमावल्यास सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग बंद होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आरक्षण मिळवून देण्याची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी.

संसदेतही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आलेली आहे. या सगळ्यांचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य पावले उचलावीत, असेही विनोद पाटील म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT