Latest

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांचे राजीनामे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (दि. २६) स्वीकारला. दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. सर्व CWC सदस्य, AICC सरचिटणीस आणि प्रभारी यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे, अशी माहिती काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा उपस्थित होते. त्याचबरोबर  सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले होते. (Congress president Mallikarjun Kharge)

मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात जाण्यापूर्वी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT