Latest

बारामती पंचायत समितीच्या १४ गणांचे आरक्षण जाहीर

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती पंचायत समितीच्या १४ गणांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सोडतीत आरक्षण निश्चित करण्यात आले. तालुक्यात पाच जागा सर्वसाधारण आहेत.

सुपा, शिर्सूफळ, काटेवाडी, वाघळवाडी व निंबुत हे गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहेत. पणदरे, मुढाळे, मोरगाव, डोर्लेवाडी हे गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. काऱहाटी व निरावागज हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. तर गुणवडी गण अनुसुचित जातीसाठी, वडगाव निंबाळकर गण अनुसुचित जातीच्या महिलेसाठी तर सांगवी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT