Latest

१६४ वर्षांत प्रथमच असं घडलं, १५ फेऱ्यांपर्यंत लांबलेल्या US House Speaker निवडणुकीत केविन मॅककार्थी विजयी

दीपक दि. भांदिगरे

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन; अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभागृहाचे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) सभापती म्हणून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार केविन मॅककार्थी (Kevin McCarthy elected US House Speaker) यांची निवड झाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. ही निवडणूक १५ फेऱ्या आणि तब्बल चार दिवस लांबली. सभापदीपदाच्या निवडणुकीत १५ व्या फेरीत रिपब्लिकन केविन मॅककार्थी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. प्रतिनिधी सभागृह हे अमेरिकी संसेदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असताना मॅककार्थी यांना विजयासाठी १५ व्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला.

सभापती निवडणुकीतील ४२८ मतांपैकी मॅककार्थी यांना २१६ आणि डेमोक्रॅट पक्षाचे हकीम जेफ्रीस यांना २१२ मते मिळाली. मॅककार्थी यांच्या विजयानंतर त्यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अभिनंदन केले आहे. १४व्या फेरीच्या मतदानादरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर १५ व्या फेरीत मॅककार्थी यांनी बहुमत सिद्ध केले. ही निवडणूक तब्बल चार दिवस चालली. अमेरिकी संसदेच्या १६४ वर्षांतील इतिहासात सर्वात लांबलेली ही निवडणूक ठरली आहे. या विजयानंतर केविन मॅकार्थी (५७) यांनी आता डेमोक्रॅटिक पक्षाच्या ८२ वर्षीय नॅन्सी पेलोसी यांची हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये जागा घेतली आहे.

केविन मॅकार्थी यांना सभापती म्हणून निवडण्यात रिपब्लिकन पक्षात एकजूट नव्हती. त्यांना पक्षातच बंडखोरीचा सामना करावा लागला. यामुळे त्यांना १४ व्या फेरीतही बहुमत मिळू शकले नव्हते. ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकांनंतर ४३५ सदस्यांच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांची संख्या २२२ झाली होती. यामुळे प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत संपुष्टात आले होते. (Kevin McCarthy elected US House Speaker)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT