Latest

Republic Day 2024 Live Updates | राष्ट्रपती मुर्मू यांनी फडकवला तिरंगा, नारी शक्तीचे कर्तव्यपथावर दर्शन

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज संपूर्ण भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमच अंमलात आली, ज्याला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले हे सर्वज्ञात आहे. यंदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. कर्तव्य पथावर आयोजित मुख्य कार्यक्रमात परेडसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. सध्या दिल्लीचे छावणीत रूपांतर झाले असून प्रत्येक कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांना आज वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. येथे त्यांनी २ मिनिटे मौन बाळगले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही यावेळी उपस्थित आहेत.

यावेळी प्रथमच तीनही सैन्यदल, निमलष्करी गट आणि पोलीस दलाचे नेतृत्व महिला करत आहेत. तिन्ही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व भारतीय लष्कराचे कॅप्टन शरण्य राव करत आहेत. केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकडीत महिला कर्मचारीही सहभागी झाल्या आहेत. BSF, CRPF आणि SSB च्या महिला कर्मचारी 350CC रॉयल एनफिल्ड बुलेटवर स्वार होऊन साहसाचे दर्शन घडवणार आहेत. तर कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन होत आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्तव्यपथावर तिरंगा फडकावला आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे संचलन सुरु झाले. भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता,  एकता आणि प्रगती यासह वाढत्या स्वदेशी क्षमतांच्या पाठबळाने निर्माण झालेले लष्करी सामर्थ्य आणि वृद्धिंगत होणाऱ्या नारी शक्तीचे दर्शन कर्तव्यपथावर होत आहे.

प्रथमच, १०० हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची  सुरुवात केली. या महिला कलाकारांनी वाजवलेल्या शंख, नादस्वरम, नगारा इत्यादी वाद्य संगीताने संचलनाची सुरुवात झाली. कर्तव्यपथावर पथसंचलनामध्ये पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र  तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळत आहे. महिला वैमानिकही नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ)तुकड्यांमध्ये केवळ महिला जवान असणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT