Latest

Remote control car : रिमोट कारचा प्रथम विश्वविक्रम, नंतर भयंकर स्फोट!

Arun Patil

लंडन : ब्रिटिश विश्वविक्रमादित्य जेम्स व्होम्सलीच्या जेट इंजिनवरील एका रिमोट कंट्रोल कारने गिनिज विश्वविक्रम नोंदवला आणि तिसर्‍या प्रयत्नांत आणखी वेग वाढवताना या कारचा भयंकर विस्फोटही झाला.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, जेम्स व्होम्सली हा बॅकयार्ड एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी ओळखला जातो. त्याने प्रोजेक्ट एअर हे यू ट्यूब चॅनेलही सुरू केले आहे. रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या जेट पॉवर कारच्या माध्यमातून सर्वात जलद वेगाचा विक्रम त्याच्या खात्यावर आहे.

जेम्सच्या कारने प्रतितास 152.40 किमी वेग नोंदवला आणि याची गिनिज रेकॉर्डमध्ये नोंदही झाली. पण, नंतर आणखी वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेल्यानंतर या कारचा जागीच भयंकर स्फोट झाला. जेम्सने यावेळी आपल्या व्हिडीओ चॅनेलवर बोलताना हा प्रकल्प सर्वात तणावपूर्ण, सर्वात थकवणारा आणि सर्वात वेदना देणारा ठरल्याचे नमूद केले.

या निकषावर यापूर्वी कोणताही विक्रम नव्हता. पण, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी जेम्सच्या कारने किमान प्रतितास 150 किमीचा वेग नोंदवणे आवश्यक होते. जेम्सने आपल्या दुसर्‍या प्रयत्नात 137 किमी इतका वेग नोंदवला. पण, यावेळी कारचा दर्शनी भाग कोसळल्याने हा प्रयत्न ग्राह्य धरण्यात आला नाही. त्याने तिसर्‍या प्रयत्नात 141 किमीपर्यंत मजल मारली होती.

जेम्स मागील वर्षभरापासून रिमोट कंट्रोलवरील जेट पॉवर कार तयार करत होता. मात्र, इतका वेग कोणत्याच कारला घेता आला नव्हता. आता त्याच्या एका कारने गिनिज बुकमध्ये जरुर स्थान मिळवले. पण, त्याचवेळी या कारचा मोठा स्फोट झाल्याने जेम्सची निराशाही झाली.

SCROLL FOR NEXT