Latest

Agniveer Recruitment : अग्निवीरसाठी पुणे विभागात भरती

Arun Patil

सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून Agniveer Recruitment अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 22 मार्च 2024 पर्यंत करावयाचे आहेत. परीक्षा 22 एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होतील.

* वरील पदाची परीक्षा दोन टप्प्यांत होईल.
1) लेखी परीक्षा 2) शारीरिक चाचणी
परीक्षा फी – 250 रुपये.

पात्रता : सैनिक, टेक्निकल, नर्सिंग सहायक.
10+2 विज्ञान शाखेतून पास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्लिश विषयांमध्ये एकूण 50 टक्के मार्क असावेत. प्रत्येक विषयात 40 टक्के गुण आवश्यक.

वय : 17 1/2 ते 23 वर्षे, उमेदवाराचा जन्म 1ऑक्टोबर 2001 ते 1 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा.
12 वीला अ‍ॅपिअर असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. दुसर्‍या टप्प्यापूर्वी त्याची परीक्षा झालेली असावी.

* उमेदवाराची उंची : 167 cms, वजन – उंचीच्या प्रमाणात, छाती – 77 cms + फुगवून 5 cmc, खेळाडूंना – उंचीमध्ये 2 cms, छातीमध्ये 3 सें.मी., वजन 5 kgs सवलत.
* सैनिकाच्या पाल्यांना (फक्त एकाच मुलाला) 200 गुणांपैकी 20 गुण सवलतीत मिळतात.
* खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर – 20 गुण.
* खेळाडू राज्यस्तरीय – 15 गुण.
* खेळाडू प्रतिनिधी महाविद्यालय किंवा विद्यापीठ – 10 गुण.
* खेलो इंडिया विजयी खेळाडू – 10 गुण.
* जिल्हास्तरावरील खेळाडू – 5 गुण.
* स्कूल गेम्स प्रतिनिधी – 5 गुण.
* NCC A – 5 गुण, NCC B – 10 गुण, NCC C – 15 गुण, NCC C आणि प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये समावेश – 20 गुण, खेळाचे सर्टिफिकेट हे दोन वर्षांच्या आतील असावे, तरच ग्राह्य धरले जाते.

* परीक्षा – वस्तुनिष्ठ स्वरूपाची 50 प्रश्न सैनिक 1 तास, इतर 100 प्रश्न 2 तास. 1/4 नकारात्मक गुण पद्धत.

* आवश्यक कागदपत्रे – दुसरा टप्पा

प्रवेश पत्र, शैक्षणिक कागदपत्रे, 20 पासपोर्ट साईज फोटो, अधिवास, जात, धर्म, चरित्र, अविवाहित, नातेसंबंध, NCC, स्पोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड सर्व ओरिजनल कागदपत्रे आवश्यक.

* शारीरिक चाचणी – 1.6 km धावणे – 5 मि. 45 सेकंदच्या आत. फुलअप्स, 9 फुट लांब उडी zig zag balance

* पुणे विभागामध्ये – पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, कोकण, नाशिक, लातूर या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

* संदर्भ –आर्मी GD साठी – रामसिंग यादव झालेले पेपर्स व पुस्तक.

नर्सिंग सहायक, टेक्निकल – रामसिंग यादव प्रश्नपत्रिका व पुस्तक. चालू घडामोडीसाठी – प्रतियोगिता साहित्य किंवा Speedy चे मासिक.

* विज्ञान – ल्यूसेन्ट व सामान्यज्ञान ल्यूसेन्ट तसेच सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

* अधिक माहितीसाठी joinindianarmy.nic.in
ssc GD ची तयारी करताना मुलांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा व अंकित भाटिया संदर्भ साहित्य म्हणून वापरावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT