Latest

Supreme Court : न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 10.40 तासांत 75 प्रकरणांची सुनावणी

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी 10.40 तासांत 75 प्रकरणांची सुनावणी घेतली.

Supreme Court : सामान्यपणे न्यायालयाचे कामकाज हे सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत संपते. मात्र, शुक्रवार नंतर शनिवार रविवार सुट्टी आणि नंतर पुन्हा दुर्गापूजा आणि विजया दशमीची सुट्टी आहे. न्यायालयाचे कामकाज चार ते पाच दिवस होणार नव्हते. त्यामुळे तर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर दुर्गापूजा विजयादशमीच्या सुटीपूर्वी रात्री 9:10 वाजेपर्यंत सुनावणी घेतली. या दरम्यान त्यांनी 75 प्रकरणांची सुनावणी घेतली. त्यांच्या खंडपीठाने सलग 10 तास 40 मिनिटे सुनावणी घेतली.

Supreme Court दसऱ्याच्या सुटीपूर्वी शुक्रवार हा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. खटला पुढे ढकलणे म्हणजे दीर्घ प्रतीक्षा. गेल्या महिन्यात 16 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर संध्याकाळी 7.45 पर्यंत सुनावणी केली होती. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचू़ड हे देशाचे भावी सर न्यायाधीश आहेत.

Supreme Court : या वर्षी जुलैमध्ये, विद्यमान मुख्य न्यायाधीश उदय लळित यांनी सकाळी 9.30 वाजता प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या न्यायालयात सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी सुरू केली. ते म्हणाले की, मुले सकाळी ७ वाजता तयार होऊन शाळेत जाऊ शकतात, मग आम्ही लवकर न्यायालयात का येऊ शकत नाही.

SCROLL FOR NEXT