Latest

वाचा आपलं साप्ताहिक राशिभविष्य

सोनाली जाधव

वाचा आपलं साप्ताहीक राशिभविष्य

24 ते 30 एप्रिल 2022 

हा सप्‍ताह मिथुन, कर्क, वृश्‍चिक, कुंभ राशी गटाला उत्तम; तर वृषभ, कन्या, मकर राशी गटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश – दि. 24 बुध वृषमेत 24/14, 27 – शुक्र मीनेत 18/17, 29 – शनि कुंभेत 7/51. महत्त्वाचे ग्रहयोग – दि. 24 – बुध केंद्र शनि, बुध लाभ नेपच्युन, 27 – बुध लाभ गुरू, शुक्र युति नेपच्युन, 28 – बुध त्रिकोण प्लुटो, 30 – रवि युती चंद्र, शुक्र युती गुरू.

मेष – धाडसी, लहरी रहाल 


रवि, राहू, हर्षल 1 ले. वृत्ती धाडसी व लहरी राहील. त्याचे अनिष्ट परिणाम होतील. भाऊबंदकी जाणवेल. आर्थिक प्राप्‍ती चांगली होईल. चैनीकडे प्रवृत्ती राहील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला मानसन्मान लाभेल. कामाचा आर्थिक मोबदला मिळेल. एकदोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे, चिडचिडीचे जातील. सप्‍ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे उत्साहात हाती घ्याल.

कर्क – धंद्यात शत्रुत्व 


रवि, हर्षल, राहू 10 वे. धंदा-व्यवसायात शत्रुत्व वाढेल. अधिकार वापराल. मुत्सद्दीपणाचा कस लागेल. कामाचे कौतुकही होईल; पण मित्रांच्यावर पूर्ण विसंबू नका. अडचणीत याल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला यश इतरांच्या सहकार्याने मिळेल. एकदोन दिवस शारीरिक दगदगीचे, सर्दी, पडसे, निरुत्साहीपणाचे जातील. वरिष्ठांची मर्जी. सप्‍ताहाच्या शेवटी कामाचे समाधान मिळवाल.

तुळ-भावनिक वादळे


रवि, राहू, हर्षल 7 वे. अहंकारामुळे भावनिक वादळात अडकाल. संततीवर प्रेम राहील. जवळच्या व्यक्‍तींना दुखवू नका. शेतीबागायतीची कामे होतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. संततीच्या अडचणी समजून घ्या. शत्रूच्या बाबतीत मवाळ धोरण स्वीकाराल. सप्‍ताहाच्या शेवटी यश इतरांच्या सहकार्याने मिळेल.

मकर – मन उद्विग्‍न होईल


रवि, राहू, हर्षल 4 थे. घरगृहस्थीच्या काळजीने मन मधून मधून उदास होईल. घरात मतभेद राहतील. राहत्या जागेत बदल होतील. कल्पनाशक्‍ती चांगली राहील. आर्थिक लाभ होतील. विलंब, अडचणी, त्रास यांचा सतत सामना करावा लागेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला पती-पत्नी एकविचाराने उत्साहाने कामे कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. यशासाठी एकदोन दिवस धावपळ होईल. शेवटी थकवा जाणवेल.

वृषभ-आर्थिक हानी


रवि, हर्षल, राहुल 12 वे. अचानक खर्च उद्भवतील. आर्थिक हानी होईल. आक्रमक कृती आवरा. आर्थिक प्राप्‍तीही चांगली होईल. पण प्रलोभने टाळा. धंद्यात अस्थिरता जाणवेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला कामातील कायदेशीर बाजू समजून घ्या. वरिष्ठांच्या सूचना पाळा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. आर्थिक मोबदला मिळेल. शेवटी खर्च वाढेल.चिडचिड होईल.

सिंह – सामाजिक कार्यात सहभाग


रवि, राहू, हर्षल 9 वे. सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. प्रवासाचे योग येतील. भाग्यकारक अनुभव येतील. जोडीदाराचा सल्ला उपयुक्‍त राहील. अचानक धनलाभ होईल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला विसरभोळेपणामुळे नुकसान होईल. भावनिक दडपण राहील. शारीरिक व्याधी, सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांचे मनावर दडपण राहील. धार्मिक कृत्यासाठी खर्च कराल.

वृश्चिक- कामात यश


रवि, राहू, हर्षल 6 वे. आग्रही रहाल. एखादी चांगली संधी लाभेल. यश खेचून आणाल. पोटाची तक्रार जाणवेल. नातेवाईकांचे फार मनावर घेऊ नका. वाहनसौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे होतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवासासाठी खूप धावपळ होईल. कामे होतील. एकदोन दिवस घरगृहस्थींना प्राधान्य द्याल. संततिसौख्य लाभेल. शेवटी मनोबल वाढेल. कामात यश मिळेल.

कुभ-धाडस व प्रयत्नांनी स्वतःला सिद्ध कराल


रवि, राहू, हर्षल 3 रे. धाडस व प्रयत्नांनी स्वतःला सिद्ध कराल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्‍ती चांगली होईल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्‍ती होईल. शत्रूला नामोहरण कराल. भाग्याला कर्माची जोड लाभेल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. कामे बिघडतील. चिडचिड होईल. एकदोन दिवसानंतर मनोबल वाढेल. कर्माला भाग्याची जोड लाभेल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. सप्‍ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल.

मिथुन-अनेक मार्गांनी लाभ


रवि, राहू, हर्षल 11 वे. अनेक मार्गांनी लाभ होतील, पण उत्तम मार्ग निवडा. कार्यधुरंधरता दाखवाल. भाग्य बलवान राहील. विश्‍वासार्हता टिकवा. धंद्यात अडचणी निर्माण होतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला थकवा एकदोन दिवसात दूर होईल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. शेवटी आर्थिक मोबदला मिळेल.

कन्या-शारीरिक दगदग


रवि, राहू, हर्षल 8 वे. शारीरिक व्याधी, सर्दी, पडसे, दगदग जाणवेल. कामातील चुका दुरुस्त करा. आर्थिक कोंडी होईल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. गैरसमज होतील. सप्‍ताहाच्या सुरुवातीला शिक्षणामधील अडथळे दूर करा. मनोबल वाढेल. वाद टाळा. गुप्‍त शत्रू असतील. सहजीवन लाभेल. सप्‍ताहाच्या शेवटी सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

धनु-मानसिक गळचेपी


रवि, राहू, हर्षल 5 वे. एकप्रकारे मानसिक गळचेपी होईल. महिलांना प्रसूतिसमयी त्रास होईल. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. निर्णायक कामात यश मिळेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. पण त्रास, विलंब, अडचणी अनुभवाल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजा, समस्यांपायी खर्च होईल. एकदोन दिवस धावपळीचे जातील. कामात यश मिळेल. घर प्रॉपर्टीची कामे होतील. शेवटी शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

मीन-आर्थिक आवक जेमतेम


रवि, राहू, हर्षल 2 रे. आर्थिक प्राप्‍ती जेमतेम राहील. खर्च वारेमाप होईल. कामात कलात्मकता व सावधगिरी राहील. महत्त्वाकांक्षी पण संवेदनशील रहाल. परदेश गमनाची संधी लाभेल. चैन कराल. सप्‍ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. एकदोन दिवस खर्चाचे, चिडचिडीचे जातील. कामे रेंगाळली तरी एकदोन दिवसात ती पूर्ण करू शकाल. अभ्यासूवृत्ती राहील. सप्‍ताहाच्या शेवटी कुटुंबाच्या गरजा व समस्याकडे पहाल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT