Latest

IPL Playoff Scenario : ‘हे’ 4 संघ गाठणार प्लेऑफ! जाणून घ्या समीकरण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Playoff Scenario : गुजरात टायटन्स. आयपीएल 2022 चा चॅम्पियन आणि आयपीएल 2023 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाव्यतिरिक्त, अद्याप कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. आता तीन जागांसाठी सात संघांमध्ये लढत सुरू आहे. यापूर्वीच दोन संघ अर्थात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 'या' संघांमध्ये चुरस

आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर असून प्लेऑफमध्ये देखील प्रवेश केला आहे. हार्दिक पंड्याच्या या संघाचे सध्या 18 गुण आहेत. त्यांचा एक सामना बाकी आहे. जर शेवटचा सामना जिंकल्यास ते 20 गुणांपर्यंत झेप घेऊ शकतात. पण हा सामना हरले तरी ते पहिल्या क्रमांकावरच राहतील. अव्वल स्थानासाठी त्यांचा कोणीही स्पर्धक नाही. जी स्पर्धा आहे ती केवळ दुस-या, तिस-या आणि चौथ्या क्रमांकासाठी आहे. (ipl playoff scenario)

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज 13 सामन्यांत 15 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर संघाने शेवटचा सामना जिंकला तर त्याचे जास्तीत जास्त 17 गुण होऊ शकतात, अशीच बाब एलएसजी म्हणजेच लखनौ सुपरजायंट्सची आहे. (ipl playoff scenario)

मुंबई इंडियन्स सध्या 13 सामन्यांतून 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर एमआयने शेवटचा सामना जिंकला तर त्यांचे 16 गुण होतील. म्हणजेच सीएसके आणि एलएसजीने सामने हरले आणि मुंबई जिंकली, तर त्यांना दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी असेल. पण जर सीएसके किंवा एलएसजीने शेवटचा सामना जिंकला तर एमआयला विजयानंतरही तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.

आरसीबीला अजूनही टॉप 4 मध्ये जाण्याची संधी (ipl playoff scenario)

आरसीबी हा आणखी एक संघ आहे जो 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी आतापर्यंत 12 सामने खेळले असून दोन सामने बाकी आहेत. सध्या संघाच्या खात्यात 12 गुण जमा झाले आहेत. शेवटचे दोन्ही सामने जिंकून संघ 16 गुण मिळवू शकतो. जर आरसीबीला दोन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आणि त्याच्या पुढील संघांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवला तर आरसीबीला टॉप 4 मध्ये प्रवेश करणे कठीण होईल. तथापि, आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा रन रेट सकारात्मक आहे, जो खूप फायदेशीर ठरू शकतो.

आतापर्यंत जी शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार गुजरात पहिल्या क्रमांकावर, तर सीएसके दुसऱ्या, त्यानंतर एलएसजी तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. आज (दि.18) मुंबई इंडियन्सला मागे टाकण्यासाठी आरसीबीला हैदराबादविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. असे झाल्यास अव्वल चार संघांपैकी तीन संघांचे समीकरण फक्त आरसीबी खराब करेल यात शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT