Latest

RCB vs LSG : लखनौचे बंगळुरूला 182 धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर लखनौने बंगळुरूसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (RCB vs LSG)

लखनौला पाचवा धक्का

लखनौला 148 धावांवर पाचवा धक्का बसला. यश दयालने आयुष बडोनीला डुप्लेसिसकरवी झेलबाद केले. बडोनी यांना खातेही उघडता आले नाही.

लखनौला चौथा धक्का; क्विंटन डी कॉक बाद

लखनौला 143 धावांवर चौथा धक्का बसला. क्विंटन डी कॉक 56 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 81 धावा करून बाद झाला. त्याला मयंक डागरच्या हाती रीस टोपलीने झेलबाद केले. सध्या निकोलस पुरन आणि आयुष बडोनी क्रीजवर आहेत. 17 षटके पूर्ण झाली आहेत.

लखनौला मोठा धक्का; मार्कस स्टॉइनिस बाद

लखनौला 129 धावांवर तिसरा धक्का बसला. मार्कस स्टॉइनिस 15 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. त्याला मॅक्सवेलने मयंकच्या हाती झेलबाद केले. स्टॉइनिसने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार मारले. 14 षटकांनंतर लखनौची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा आहे. सध्या डी कॉक आणि निकोलस पूरन क्रीजवर आहेत.

डेकॉकचे अर्धशतक

क्विंटन डी कॉकने 36 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. 12 षटकांनंतर लखनौची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 102 धावा आहे. सध्या डी कॉक 38 चेंडूत 58 धावा आणि मार्कस स्टॉइनिस 9 चेंडूत 9 धावा करत क्रीजवर आहे.

लखनौला दुसरा धक्का; देवदत्त पडिक्कल बाद

लखनौ संघाला दुसरा धक्का नवव्या षटकात ७३ धावांवर बसला. सिराजने देवदत्त पडिक्कलला यष्टिरक्षक अनुज रावतकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत सहा धावा केल्या. सध्या डी कॉकने 43 धावा केल्या.

लखनौला पहिला धक्का; के. एल. राहूल बाद

लखनौ सुपरजायंट्सला 53 च्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. कर्णधार केएल राहुल 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. त्याला मॅक्सवेलने मयंक डागरच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघात बदल

बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या जागी वेगवान गोलंदाज रीस टोपलीला संघात संधी देण्यात आली आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुलनेही प्लेइंग-11 बदल करत मोहसीन खानच्या जागी यश ठाकूरला संघात स्थान दिले आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांना स्पर्धेमध्ये प्रत्येकी एकच सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूने तीनपैकी एक सामना जिंकला आहे. तर लखनौने दोनपैकी एक सामना जिंकला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT