Latest

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे ऑस्ट्रेलियन राजदूत बैरी ऑफ फॅरेल यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. रतन टाटा यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियावर चांगला प्रभाव पडला आहे, असे त्‍यांनी आपल्‍या ट्वीटमध्‍ये

ऑस्ट्रेलियन राजदूताने ट्वीट करत दिली माहिती

रतन टाटा यांना ऑस्ट्रेलिया-भारत द्विपक्षीय संबंध, खासकरुन व्यापार, गुंतवणूक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जनरल डिवीजनमध्ये एक मानद अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ऑस्टेलायाचे राजदूत बॅरी ऑफ फॅरेल यांनी शनिवारी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्‍यांनी म्‍हटलं आहे, रतन टाटा केवळ भारतीय उद्योगपतीच नाहीत. तर त्यांनी ऑस्ट्रेलियासाठीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

टाटा ग्रुपला यशाच्या शिखरावर पोचविण्‍यामध्‍ये सिंहाचा वाटा असणारे रतन टाटा यांचा देशातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये समावेश आहे. त्‍यांच्‍याकडे चार हजार कोटींची संपत्ती आहे.  त्यांची दानशूर व्यक्ती म्हणूनही ओळख आहे. त्यांनी कोरोना महामारीमध्ये भारत सरकारला १५ हजार कोटी रुपये दान केले होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT