Latest

रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ; पुणे सत्र न्यायालयाचे पुन्हा चौकशीचे आदेश

अमृता चौगुले

पुणे : पुढारी ऑनलाईन डेस्क :  पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी या प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे या एकंदरीत प्रकरणाची दिशा बदलण्याची शक्यता वाढली आहे.  फोन टॅपिंगचे आदेश रश्मी शुक्ला यांनी दिले असल्याचा खुलासा डहाणे यांनी केला आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 या कालावधीमध्ये हे फोन टॅप केले गेले असल्याचं बोललं जात आहे. डहाणे यांच्या खुलाशामुळे या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेशही पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत.  या फोन टॅपिंग प्रकरणात काही महत्त्वाचे नेते, आमदार, काही सरकारी अधिकारी आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केल्याचं समोर येत आहे.

क्लीन चिट फेटाळली…

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. तपासानंतर पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली होती. २०२२ मध्ये पुणे पोलिसांनी रश्मी यांना क्लीन चिट दिली. पण न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळत पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

SCROLL FOR NEXT