Latest

Ukraine war : बलात्कारातील आरोपी युक्रेनविरोधातील युद्धात

दिनेश चोरगे

मॉस्को; वृत्तसंस्था : रशियात प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या आरोपीची सुटका करण्यात आली असून तो 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्याऐवजी आता युक्रेनविरोधातील युद्धात उतरला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानुसार त्याच्यासारख्या अनेक कैद्यांना युक्रेनविरोधात लढण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. हे कैदी आता लष्करी गणवेश घालून अन्य सैनिकांसोबत सेल्फी काढत असल्याची माहिती समोर आली आहे.

व्लादिस्लाव कनायुस असे या आरोपीचे नाव असून त्याने आधी त्याची प्रेयसी वेरा पेखतेलेवावर बलात्कार केला आणि सुमारे चार तास छळ केल्यानंतर तिच्यावर चाकूने 111 वार केले. तसेच वायरने गळा चिरला. वेराने व्लादिस्लावसोबतचे नाते तोडल्याने त्याने हे कृत्य केले. व्लादिस्लावने (वय 27) वर्षाच्या सुरुवातीला वेरावर (वय 23) बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. व्लादिस्लावला वाईट सवयी असल्याने वेराने नाते तोडले. यानंतर संतप्त झालेल्या व्लादिस्लावने वेराच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला.
फोनला पोलिसांचा प्रतिसाद नाही

वेराच्या फ्लॅटमधून ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या शेजार्‍यांनी सात वेळा पोलिसांना फोन केला; पण पोलिसांनी एकदाही फोनला उत्तर दिले नाही. यानंतर व्लादिस्लाव घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर वेराच्या आईने पोलिसांकडे जाऊन घटनेची माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT