पुढारी ऑनलाईन डेस्क : रणदीप हुड्डाचा चित्रपट 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर' २२ मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता रणदीपचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण थक्क आहेत. देशभरात हिंदी, मराठी भाषेत चित्रपट रिलीज झाला. (Swatantryaveer Savarkar BO) पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर' चित्रपटाचे कलेक्शन मध्यम राहिले. या चित्रपटाची कुणाल खेमू दिग्दर्शित चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस' शी तगडी स्पर्धा झाली. यामध्ये मडगाव एक्सप्रेस बॉक्स ऑफिसवर पिछाडीवर पडला. (Swatantryaveer Savarkar BO)
रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्यवीर वीर सावरकर' ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर यांचा बायोपिक आहे. अभिनेता रणदीप हुड्डाने यामध्ये वीर सावरकर यांची भूमिका साकारली. तर अंकिता लोखंडेने त्यांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका साकारली आहे.
कुणाल खेमूचा चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस'ने बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी एन्ट्री घेतली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ओपनिंग डेला १.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. कमाईच्या 'मडगाव एक्सप्रेस' पिछाडीवर आहे. चित्रपटाने दिव्येंदु शर्मा, अविनाश तिवारी आणि प्रतीक गांधी लीड भूमिकेत आहे. तर नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहे.
—