Latest

Sergeant Trailer : रणदीप हुड्डाच्या सस्पेंस ड्रामा ‘सार्जेंट’ ट्रेलर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या आगामी 'वीर सावरकर' या चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. यासोबतच त्याच्या आणखी एक सस्पेंस कॉप-ड्रामा असलेला नवा चित्रपट चाहत्यांच्या भेटीस लवकरच येत आहे. आगामी 'सार्जेंट' हा चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ( Sergeant Trailer ) नुकताच पाहायला मिळतोय. यामध्ये अभिनेता रणदीप एका मुलीच्या मृत्यूच्या रहस्याचा उलघडा करताना दिसत आहे.

'सार्जेंट' च्या १ मिनिट ३४ सेंकदांच्या ट्रेलमध्ये ( Sergeant Trailer ) पहिल्यांदा रणदीप हुडाच्या भूमिकेचा परिचय होतो. चित्रपटात त्याचे नाव सार्जंट निखिल शर्मा असून त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. निखिल शर्मा एका मुलीच्या मृत्यूचे रहस्याचा उलघडा करण्याचा प्रयत्न करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे.

एका मुलीच्या मृत्यूचे कारण ड्रग्जचा ओव्हरडोस असल्याने झाला असल्याचे दाखवून केस बंद करण्यात आली होती. मात्र, तिचा खून झाल्याचा संशय निखिलला येतो आणि तो त्याच्या शोधासाठी शर्तीचे प्रयत्न करतो. काहीवेळा तो नियम मोडून तो या प्रकरणाचा तपास करून मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना यात दिसत आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट सस्पेन्स आणि कॉप ड्रामाने भरलेला असल्याचे दिसतेय.

प्रवल रमन दिग्दर्शित 'सार्जेंट' हा चित्रपट सस्पेन्सफुल कॉप-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. रणदीपसोबत चित्रपटात अरुण गोविल, आदिल हुसैन आणि सपना पब्बी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT