Latest

Ranbir Kapoor : ना मांसाहार, ना दारू; रणबीरने ‘रामायण’साठी वर्ज्य केल्या ‘या’ गोष्टी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रामायण चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) अनेक गोष्टी वर्ज्य केल्याची माहिती समोर आलीय. रणबीर कपूर आपला आगामी चित्रपट रामायणमध्ये अभिनय साकारत आहे. (Ranbir Kapoor)

नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन असलेला रामायण चित्रपट चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात रणबीर आणि अन्य स्टारकास्ट आपल्या लाईफस्टाईलमध्ये अनेक बदल करत आहेत. रणबीरने या भूमिकेसाठी अल्कोहोल आणि मांसाहारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे शूटिंग होऊपर्यंत रणबीर या गोष्टी वर्ज्य करणार असल्याचे कळते. तो आता लेटनाईट पार्टीदेखील करत नसल्याचे म्हटले गेले आहे.

रामायणमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत असेल. तर केजीएफ स्टार यश रावणच्या भूमिकेत असेल. या चित्रपटाचे शूटिंग २०२४ मध्ये सुरु होईल. पण, अद्याप याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT