Latest

Ramayana च्या सेटवरून साई पल्लवी-रणबीरचे फोटो लीक; प्रभू राम-सीता मातेच्या भूमिकेत!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून साई पल्लवी आणि रणबीर कपूर यांचे फोटो लिक झाले आहेत. काही फोटो एक्स अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. याआधी दिग्दर्शकाने सेटवर 'नो फोन पॉलिसी' चे आदेश दिले होते. आता सेटवरून प्रभू राम आणि सीता मातेच्या भूमिकेतील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी दिसत आहेत.

काही फोटो मध्ये कलाकार शॉट देताना दिसले तर कधी रणबीर कपूर स्क्रिप्टवर नजर टाकताना दिसला. साई पल्लवीच्या डोक्यावर एक मोठा बनारसी सिल्क दुपट्टा, लांब केस असा लूक दिसतो आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. रणबीर कपूर भगवान राम आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहेत. रिपोर्टनुसार, रणबीरने हादेखील दावा केला आहे की, या भूमिकेच्या शूटिंगपासून तो शाकाहारी बनला आहे.

रणबीर कपूर -साई पल्लवीचे फोटो लीक

रणबीर कपूर -साई पल्लवी उद्यानात फिरतानाचे फोटो असल्याचे दिसते. मागे पाणी आणि एक भव्य महलची भिंत दिसत आहे. याआधी सेटवरून लारा दत्ता, अरुण गोविल फोटोज व्हायरल झाले होते. यामध्ये लारा ही कैकेयी तर राजा दशरथ यांच्या भूमिकेत अरूण गोविल दिसत होते. शीबा हीचड्ढा मंथरा यांच्या अवतारात दिसत होती.

SCROLL FOR NEXT