Latest

एक जागा द्या, नाहीतर तोंड लपवायला जागा राहणार नाही : रामदास आठवले

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले. तसेच महायुतीने आरपीआयला एकही जागा दिली नाही, तर आपल्याला तोंड लपवायला जागा उरणार नसल्याचा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या 

रामदास आठवले यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. भाजप आणि महायुतीने 'अब की बार 400 पार' ही घोषणा दिली आहे. यात आरपीआयचेही मोठे योगदान असणार आहे. त्यामुळे महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणूक लढवू द्यावी.

मी दोनवेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार झालो होतो. तिसर्‍या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण मला आता परत शिर्डीतून निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली.

केवळ अजित पवार आले म्हणून भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीची महायुती बनली नाही. आम्हीसुद्धा भाजपसोबत असल्याने महायुती आकाराला आली आहे, याकडे आठवले यांनी लक्ष वेधले.

SCROLL FOR NEXT