Latest

’50 खोके एकदम…ओक्के खेळत बसा तुम्ही एक्के’……… म्हणत पन्नास खोक्यांवर रामदास आठवलेंनी केली कविता

अमृता चौगुले

पुणे :  पुढारी वृत्तेसवा : पन्नास कोटी एकदम ओके ही घोषणा विधानसभेच्या पायर्‍यासह सोशल मिडीयात धुमाकूळ घालत आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले यांनी या घोषणेवर कविता केली आहे.  पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय (आठवले) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील सरकार शिंदे गट आला पण खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे ग्रुप आणि भाजप यांच्या बरोबर आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुका लढणार आहोत. आम्हांला जागा मिळाव्या यासाठी मी बावनकुळे आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यात आम्हांला चांगले प्रतिनिधित्व मिळेल. महानगरपालिका निवडणुका लवकर व्हाव्या अशी इच्छा आहे. फडणवीस शिंदे सरकारने आता प्रभाग रचनेचा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील बिल देखील पास झाले आहे. कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निवडणुका लागतील, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेच्या पार्‍यावर 50 खोके एकदम ओक्के या घोषणामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमदार हातघाईवर आले. त्याविषयी विचारले असता, '50 खोके एकदम…ओक्के खेळत बसा तुम्ही एक्के…आम्ही सगळे आहोत पक्के', अशा शब्दात कविता करत आठवले  यांनी उत्तर दिले.  दरम्यान, ब्राह्मण संघाचे आनंद दवे यांची भेट झाली.  अमृत योजनानेबद्दल चर्चा झाली. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवे अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT