Latest

अयोध्‍येतील राम मंदिर हे हिंदुत्वाचे प्रतीक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्या आणि राम मंदिर हा आमचा आस्थेचा विषय आहे. येथील राम मंदिर हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आयोध्‍या येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आज (दि.९) सकाळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्‍येतील राम मंदिरात दर्शन घेतले. यानंतर दुपारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे म्‍हणालेकी, अयोध्‍या ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी आहे. राम मंदिराचे ५०० वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होत आहे. एवढ्या वेगाने काम होईल,असे कोणालाही वाटत नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राम मंदिराचे काम सुरू झाले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. रामजन्मभूमीत एका वेगळ्या प्रकारचे वलय जाणवले. योगी आदित्यनाथही राम मंदिराचे काम पाहत आहे. प्रभू रामचंद्राचे आशीर्वादाने धनुष्यबाण मिळाला, शिवाय शिवसेना हे नावही मिळाले, असेही एकनाथ शिंदे म्‍हणाले.

आजचा दिवस माझ्यासाठी भाग्यशाली आहे. आजची यात्रा मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. राम मंदिरामुळे अनेक लोकांनाही रोजगार मिळणार आहे. काही लोकांना हिंदूत्वाची ॲलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे आमचे हिंदूत्व आहे. अन्य धर्मीयांचा आदर करणारे आमचे हिंदूत्व आहे. २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीवेळीच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सरकार सत्तेत यावी, असाच कौल जनतेने दिला होता. मात्र, स्वार्थासाठी चुकीचे पाऊल उचलण्यात आले. मात्र, आम्ही या निर्णयामध्ये सुधारणा केली आहे. , असेही शिंदे म्‍हणाले.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT