Latest

Sanjay Raut : ‘किराट सोमय्या यांचा मुलगा राकेश वाधवानचा मित्र’

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. भाजपचं लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मध्ये पडू नका. आमचं सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही काही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हे सरकार पडणार नाही हे जेव्हा त्यांना मी सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेने पीएमसीचा घोटाळा केला आहे असे किराट सोमय्या यांचा दावा आहे. परंतु किराट सोमय्या यांचा मुलगा हा त्‍या बँकेतील राकेश वाधवान मित्र आहे. किराट सोमय्या हे जे आरोप करत आहेत. त्‍यांनी एकदा आपल्‍या घरातील बघा. तसेच, पत्रा चाळीची 40 एकर जमीन ही माधन यांचे कडून  12 हजार करोड मोहित कंबोज यांने खरेदी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT