Latest

Ahmed Patel Gujarat 2017 : तीन मते बाद करण्यासाठी भाजपने अहमद पटेलांच्या ‘त्या’ खेळीचे उदाहरण का दिले?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 9 ऑगस्ट 2017 रोजी रात्री एक वाजता गुजरात विधानसभेचे ठिकाण. काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल 0.48 मतांनी राज्यसभेवर विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. भारताच्या इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच घडले होते, जेव्हा राज्यसभा निवडणुकीचा निकाल एवढ्या रात्री उशिरा लागला. निम्म्या पेक्षा कमी मताच्या फरकाने विजय मिळवल्याने एकप्रकारे इतिहासाच रचला गेला. (rajya sabha election bjp ahmed patel gujarat 2017 rajya sabha elections)

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते. काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. 3 वेळा लोकसभेचे आणि 4 वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाची ढाल मानले जात होते. पक्षाच्या चांगल्या-वाईट काळात ते नेहमीच सक्रीय राहिले. पण एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतो की अहमद पटेल यांना काँग्रेसचे चाणक्य का म्हटले गेले? हा प्रश्न समजून घेण्यासाठी 2017 च्या राज्यसभा निवडणुकीवर एक नजर टाकली पाहिजे. (rajya sabha election bjp ahmed patel gujarat 2017 rajya sabha elections)

2017 मध्ये गुजरातमध्ये 3 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली होती. ज्यामध्ये भाजपकडून अमित शाह, स्मृती इराणी आणि बलवंत राजपूत रिंगणात होते, तर अहमद पटेल काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. (rajya sabha election bjp ahmed patel gujarat 2017 rajya sabha elections)

या तीनपैकी दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित होता, मात्र तिसर्‍या जागेसाठी पेच निर्माण झाला होता. तिसऱ्या जागेसाठी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि बलवंत पटेल आमनेसामने होते. विजयासाठी 45 आमदारांच्या मतांचीही गरज होती. पण काँग्रेसची अडचण अशी होती की त्यांच्या अनेक आमदारांनी पक्षातून बंडखोरी करून आधीच राजीनामे दिले होते. यासोबतच अनेक आमदार निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करतील अशी दाट शक्यता होती. (rajya sabha election bjp ahmed patel gujarat 2017 rajya sabha elections)

अन् समीकरणे बदलले..

काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी भाजपच्या समर्थनार्थ मतदान केले. मात्र मतदान केल्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना हातवारे करून विजयाचे चिन्ह दाखविले. राज्यसभा निवडणुकीत अधिकृत एजंटला मतपत्रिका दाखवली जाते. आमदाराच्या या हावभावाची काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. काँग्रेसपासून भाजपपर्यंतच्या दिग्गज नेत्यांची झुंबड निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर पोहोचली. काँग्रेसने दोन्ही आमदारांचे मतदान रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन्ही बंडखोर आमदारांची मते रद्द करून मतमोजणी सुरू करण्याचे आदेश दिले.

बंडखोर काँग्रेस आमदार राघवभाई पटेल आणि भोलाभाई गोहिल यांची मते रद्द झाल्यानंतर एकूण मतांची संख्या 176 वरून 174 वर आली, म्हणजे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 43.51 मतांची गरज होती आणि अखेर रात्री दीड वाजून गेल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आणि अहमद पटेल विजयी झाले.

आपल्या विजयानंतर अहमद पटेल म्हणाले होते की, 'हा फक्त माझा विजय नाही. हा धनशक्ती, बलशक्ती आणि राज्य यंत्रणेच्या गैरवापराचा पराभव आहे.'

वयाच्या 26 व्या वर्षी खासदार झालेले अहमद पटेल हे काँग्रेसच्या अत्यंत वाईट काळातही चॅम्पियन म्हणून उदयास आलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. आणीबाणीनंतर 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला, तेव्हा काँग्रेसच्या वतीने संसदेत पोहोचलेल्या मोजक्या लोकांपैकी अहमद पटेल हे एक होते.

SCROLL FOR NEXT