Latest

अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मराठी भाषेतून घेतली शपथ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी संसद भवनात शपथ दिली.

अशोक चव्हाण म्हणाले, आपण महाराष्ट्राचे आहोत. मराठी लोकांकडून मला प्रेम मिळालं. म्हणूनच मी मराठीतून शपथ घेतली. मी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभेत काम केेलं. चारही सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. आज योगायोग म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेण्याची संधी मिळाली. जे जे लोक येतील ते भाजप साठी उपयुक्त ठरतील. त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी नमूद केले. युद्धात आत्मविश्वास असावा लागतो, त्यानुसार जावं लागेल. जनतेचा कौल महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

भाजपच्या स्थापना दिनी राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेतली याचा आनंद- चव्हाण

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली.  राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण 'पुढारी'शी संवाद साधताना म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम अनेक वर्ष मला मिळाले, अजुनही मिळत आहे, त्यामुळे मी मराठीत शपथ घेतली. खूप कमी लोक आहेत ज्यांनी लोकशाहीत चारही महत्त्वाच्या सभागृहांमध्ये काम केले आहे. त्यापैकी मी एक असून विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि आता राज्यसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव आहे. सोबतच भाजपच्या स्थापना दिली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेतली याचाही मला आनंद आहे," असे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT