पुढारी आनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांतचे २ वर्षांनंतर पडद्यावर आले. ही आश्चर्यकारकबाबत आहे. जेलर या चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांच्या कामाबाद्दल निर्मात्यांनी क्वचितच विचार केला असेल. रजनीकांतच्या 'जेलर'ने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली.
गेल्या 10 वर्षात तमिळ चित्रपटातील सर्वात जास्त कमाई आहे. चित्रपटांच्या इतिहासात फक्त एकाच चित्रपटाला हे यश मिळाले असून हा विक्रमही रजनीकांतच्या नावावर आहे. त्याच वेळी, जेलर कमाईच्या बाबतीत सतत चमकदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, जेलरने रविवारी 11 व्या दिवशी भारतात 19.20 कोटींची कमाई केली. जेलरने तामिळमध्ये 14 कोटी रुपये, तेलगूमध्ये 4 कोटी रुपये, हिंदीमध्ये 70 लाख रुपये आणि कन्नडमध्ये 50 लाख रुपये जमा केले. दुसरीकडे, रिलीजच्या 12 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने सुमारे 7 कोटींची कमाई केली.
रजनीकांत स्टारर जेलर परदेशातही चांगली कमाई करत आहे. अनेक देशांमध्ये जेलरने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या कलेक्शनलाही मागे टाकले आहे. जगभरात, जेलरने 22 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 180 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या आकडेवारीसह रजनीकांतच्या जेलरचे जागतिक कलेक्शन 507.4 कोटींवर पोहोचले आहे. भारतातील जेलरची एकूण कमाई 329.4 कोटी आहे. जेलर आता सर्वाधिक कमाई करणारा दुसरा तामिळ चित्रपट ठरला आहे. जेलरने 'पोनियिन सेल्वन'चा 487 कोटींचा आकडा पार केला आहे.
सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट देखील रजनीकांतचा 2.0 आहे. या चित्रपटाने 10 वर्षांपूर्वी तब्बल 776 कोटींची कमाई केली होती. 2.0 चित्रपटाच्या कमाईच्या तुलनेत जेलर अजूनही खूप मागे असला तरी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना आव्हान देण्यासाठी तो सज्ज आहे. जर जेलरची कमाई अशीच वाढत राहिली तर हा चित्रपट लवकरच धूम 3 आणि टायगर जिंदा है सारख्या चित्रपटांना मागे टाकेल ज्याने 558 कोटींची कमाई केली आहे.