Latest

सतेज पाटील यांच्या कथित शक्तीचा बुडबुडा मंडलिक यांच्या विजयाने फुटेल : राजेश क्षीरसागर

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सतेज पाटील यांच्या कथित शक्तीचा बुडबुडा खा. मंडलिक यांच्या विजयाने फुटेल, असा निशाणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी साधला. मंडलिक यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठेत झालेल्या पदयात्रेनंतरच्या सभेत ते बोलत होते.

क्षीरसागर म्हणाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील प्रभावी नेते आहेत. त्यांची मोठी शक्ती आहे, अशी हवा त्यांनी उभी केले आहे; पण तो एक बुडबुडाच आहे. काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारात पाटील यांनी गेल्या निवडणुकीत आपण मंडलिक यांना निवडून आणले, असा खोटा प्रचार चालवला आहे. गेल्या निवडणुकीत मंडलिक पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पाटील यांचा राजकीय जीव एवढा मोठा नाही. गेल्या 25 वर्षांत ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांच्यावरच उलटण्याचा उद्योग ते करत आले आहेत.

पदयात्रेत भाजपचे नेते महेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नाना कदम, प्रकाश गवंडी, सनी अतिग्रे, अशोक राबाडे, रियाज बागवान, अमेय भालकर, राहुल घाटगे, संदीप कुंभार, नरेश जाधव, सतीश घरपणकर, राकेश पवार, सूरज धनवडे, अरुण घरपणकर, रोहन शिंदे, अनंत पाटील, जयराज ओतारी, शिवतेज सावंत, चंद्रकांत शिंदे, यशश्री घाटगे, दीपाली अतिग्रे, सायली कुलकर्णी, तेजस्विनी घाटगे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT