Latest

PBKS vs RR : पंजाब किंग्ज ४ विकेटस्नी पराभूत; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Shambhuraj Pachindre

धर्मशाळा; वृत्तसंस्था : आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्ध 4 विकेटस्नी विजय मिळवला, पण त्यांचे स्पर्धेतील आव्हान आता जर-तर वर अवलंबून आहे. त्यांचे 14 सामन्यांत 14 गुण झाले असून रनरेटच्या बाबतीत ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मागे आहेत. मुंबई आणि आरसीबी चौदा गुणांवर असून त्यांचे एकेक सामने शिल्लक आहेत. हेे दोन्ही सामने त्यांनी हरले तर राजस्थानला संधी मिळू शकते, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर शेवटचा सामना किती फरकाने हरते, यावर राजस्थानचे गणित अवलंबून असेल. (PBKS vs RR)

दोघांपैकी एकाने जरी विजय मिळवला, तरी राजस्थान बाहेर होईल. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता गुजरातच्या मोठ्या विजयाच्या आणि मुंबईच्या पराभवाच्या प्रार्थना कराव्या लागतील. रनरेटच्या बाबतीत आरसीबीपेक्षा पुढे जाण्यासाठी राजस्थानला पंजाबचे 188 धावांचे आव्हान 18.3 षटकांत गाठणे आवश्यक होते; परंतु त्यांनी 19.4 षटकांत हे लक्ष्य गाठले, त्यामुळे जिंकूनही ते एका अर्थाने अडकले आहेत. तसेच पंजाब किंग्ज संघही आता अधिकृतपणे स्पर्धेबाहेर पडला आहे. (PBKS vs RR)

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर सॅम कुरेनPBKS vs RR (49*), जितेश शर्मा (44) आणि शाहरूख खान (41*) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 बाद 187 धावांची मजल मारली. राजस्थानने हे आव्हान 6 विकेटस्च्या मोबदल्यात 2 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. ध्रुव जुरेलने राहुल चहरच्या चेंडूवर षटकार ठोकून राजस्थानसाठी विजय खेचून आणला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल (50) आणि देवदत्त पडिक्कल (51) यांनी अर्धशतकी खेळी केली.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला पहिल्याच षटकात ट्रेंड बोल्टने धक्का दिला. त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला 2 धावांवर बाद केले. यानंतर शिखर धवन आणि अथर्व तायडेने डाव सावरत चौथ्या षटकात संघाला 38 धावांपर्यंत पोहोचवले.

मात्र, नवदीप सैनीने अथर्वला 19 धावांवर तर अ‍ॅडम झम्पाने शिखर धवनला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ सैनीने लिव्हिंगस्टोनचा 9 धावांवर त्रिफळा उडवत पंजाबची अवस्था 6.3 षटकांत 4 बाद 50 अशी केली.
पंजाबचे चार फलंदाज 50 धावा करतानाच गारद झाल्यानंतर सॅम कुरेन आणि जितेश शर्माने पंजाबचा डाव सावरत पंजाबला 10 षटकांत 78 धावांपर्यंत मजल मारून दिली. जितेश शर्माने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूंत 44 धावा चोपल्या. त्याने कुरेनसोबत 44 चेंडूंत 64 धावांची भागीदारी रचली. पंजाबनेही शतकी मजल मारली होती. मात्र 14 व्या षटकात सैनीने जितेश शर्माचा अडसर दूर केला.

जितेश शर्मा बाद झाला त्यावेळी डावातील 14 षटके झाली होती. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान आणि सॅम कुरेन यांनी सहाव्या विकेटसाठी पुढच्या 6 षटकांत 73 धावांची नाबाद भागीदारी रचली. यामुळे पंजाबने 20 षटकांत 5 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली. सॅम कुरेनने नाबाद 49 तर शाहरूख खानने 23 चेंडूंत नाबाद 44 धावा चोपल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने 3 विकेटस् घेतल्या.

धर्मशाळा; वृत्तसंस्था : आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी पंजाब किंग्जविरुद्ध 4 विकेटस्नी विजय मिळवला, पण त्यांचे स्पर्धेतील आव्हान आता जर-तर वर अवलंबून आहे. त्यांचे 14 सामन्यांत 14 गुण झाले असून रनरेटच्या बाबतीत ते रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मागे आहेत. मुंबई आणि आरसीबी चौदा गुणांवर असून त्यांचे एकेक सामने शिल्लक आहेत. हेे दोन्ही सामने त्यांनी हरले तर राजस्थानला संधी मिळू शकते, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर शेवटचा सामना किती फरकाने हरते, यावर राजस्थानचे गणित अवलंबून असेल.

दोघांपैकी एकाने जरी विजय मिळवला, तरी राजस्थान बाहेर होईल. त्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता गुजरातच्या मोठ्या विजयाच्या आणि मुंबईच्या पराभवाच्या प्रार्थना कराव्या लागतील. रनरेटच्या बाबतीत आरसीबीपेक्षा पुढे जाण्यासाठी राजस्थानला पंजाबचे 188 धावांचे आव्हान 18.3 षटकांत गाठणे आवश्यक होते; परंतु त्यांनी 19.4 षटकांत हे लक्ष्य गाठले, त्यामुळे जिंकूनही ते एका अर्थाने अडकले आहेत. तसेच पंजाब किंग्ज संघही आता अधिकृतपणे स्पर्धेबाहेर पडला आहे.

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर सॅम कुरेन (49*), जितेश शर्मा (44) आणि शाहरूख खान (41*) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 5 बाद 187 धावांची मजल मारली. राजस्थानने हे आव्हान 6 विकेटस्च्या मोबदल्यात 2 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. ध्रुव जुरेलने राहुल चहरच्या चेंडूवर षटकार ठोकून राजस्थानसाठी विजय खेचून आणला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल (50) आणि देवदत्त पडिक्कल (51) यांनी अर्धशतकी खेळी केली.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला पहिल्याच षटकात ट्रेंड बोल्टने धक्का दिला. त्याने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला 2 धावांवर बाद केले. यानंतर शिखर धवन आणि अथर्व तायडेने डाव सावरत चौथ्या षटकात संघाला 38 धावांपर्यंत पोहोचवले.

मात्र, नवदीप सैनीने अथर्वला 19 धावांवर तर अ‍ॅडम झम्पाने शिखर धवनला 17 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ सैनीने लिव्हिंगस्टोनचा 9 धावांवर त्रिफळा उडवत पंजाबची अवस्था 6.3 षटकांत 4 बाद 50 अशी केली.
पंजाबचे चार फलंदाज 50 धावा करतानाच गारद झाल्यानंतर सॅम कुरेन आणि जितेश शर्माने पंजाबचा डाव सावरत पंजाबला 10 षटकांत 78 धावांपर्यंत मजल मारून दिली. जितेश शर्माने आक्रमक फलंदाजी करत 28 चेंडूंत 44 धावा चोपल्या. त्याने कुरेनसोबत 44 चेंडूंत 64 धावांची भागीदारी रचली. पंजाबनेही शतकी मजल मारली होती. मात्र 14 व्या षटकात सैनीने जितेश शर्माचा अडसर दूर केला.

जितेश शर्मा बाद झाला त्यावेळी डावातील 14 षटके झाली होती. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान आणि सॅम कुरेन यांनी सहाव्या विकेटसाठी पुढच्या 6 षटकांत 73 धावांची नाबाद भागीदारी रचली. यामुळे पंजाबने 20 षटकांत 5 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली. सॅम कुरेनने नाबाद 49 तर शाहरूख खानने 23 चेंडूंत नाबाद 44 धावा चोपल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने 3 विकेटस् घेतल्या.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT